जालना :
निवडणुकीत माघार घेतली असली तरी मराठा समाजाने ठरवायचे आहे की ज्याला पाडायचं आहे – त्याला पाडावं व ज्याला निवडुन आणायचे आहे त्याला आणावे असं त्यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी केली आहे, ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, त्यांचा उभा कार्यक्रम करा, असा इशारा त्यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संभ्रम शब्द सारखा वापरला जात आहे, संभ्रम असण्याचे काही कारण नाही. आपण आरक्षणासाठी एकत्र आलोत. मराठा समाजात संभ्रम नाही. स्वत निवडून येण्यासाठी काही जण संभ्रम पसरवत आहेत. लोकसभेला सन्मान मराठा समाजाला होता. आता ज्याला पाडायचे त्याला पाडा. ज्याला निवडून आणायचे त्याला आणा, मतदान तुमच्या हातात आहे. तुमच्या हिताचा निर्णय घ्या, ज्याने आपल्या जातीवर अन्याय केला, त्याला पाडा, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे.
संपर्क
संपादक :- दयानंद भोईटे
मोबाईल : 9405749533
maratharajyanews@gmail.com