*मस्साजोग येथील आंदोलन तात्पुरते स्थगित*
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ खालील मागण्यांसाठी कालपासून गावात शांततेत रास्तारोको सुरु होता.
*मस्साजोग ग्रामस्थांच्या मागण्या*
१. संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी
२. आरोपींना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना सहआरोपी करावे
३. केजचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी करावे
४. हे प्रकरण CID कडे हस्तांतरित करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे
५. घटनास्थळाचे आय विटनेस शिवराज देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे
– सर्व आरोपींना ३ दिवसांत अटक केली जाईल
– पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबन करण्यात आले असून, निरीक्षकांच्या निलंबनाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण केली जाईल
– प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले जाईल
– सरकारी वकील नेमले जातील
प्रशासनाने सर्व मागण्यांसंदर्भात आश्वासन दिल्यानंतर प्रेताची विटंबना टाळण्यासाठी व अंत्यविधी करण्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
पुढील ३ दिवसांत जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि दगा झाला तर संपूर्ण बीड जिल्ह्याच्या वतीने मोठे आंदोलन उभा केले जाईल. पण आमच्या बांधवाला १००% न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
संपर्क
संपादक :- दयानंद भोईटे
मोबाईल : 9405749533
maratharajyanews@gmail.com