SEBC आरक्षण लागू झाल्यावर सरकारने नैसर्गिक न्यायानुसार EWS आरक्षण रद्द केले.SEBC आरक्षण लागू जरी फेब्रूवारीमध्ये झाले असले तरी शैक्षणीक प्रवेशाबाबत कोणताही शासन निर्णय आणि SEBC आरक्षण संदर्भात शैक्षणीक प्रवेशाचे धोरण सरकारने व प्रशासनाने शैक्षणीक प्रवेश सुरु होई पर्यंत ठरवले नव्हते.
यामुळे अनेक विद्यार्थी यांच्यात संभ्रमावस्था असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी EWS आरक्षणाचे उपलब्ध असलेले केंद्रीय दाखले जोडून प्रवेश घेतले आणि त्या दाखल्या आधारे CET CELL ने ते प्रवेश निश्चित देखील केले.
आता प्रवेशाबाबत मेल करून CET CELL मुलाना राज्याचे EWS द्या अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येतील असेल ईमेल पाठवत आहे,म्हणजे शासनाची SEBC मिळू देणार नाही,EWS ठेवणार नाही अशी असणारी भूमिका आज अनेकांच्या भविष्यात अंधकार निर्माण करणार आहे.सरकारने प्रशासनाला योग्य ते निर्देश देऊन त्या मुलाना संरक्षण देणे आवश्यक आहे,केवळ मराठा आहेत म्हणून त्यांचे भविष्य उध्वस्त करायची भूमिका घेऊ नये ही सरकारला विनंती.
दयानंद भोईटे
संपादक
संपर्क
संपादक :- दयानंद भोईटे
मोबाईल : 9405749533
maratharajyanews@gmail.com